सिटी बेल लाइव्ह । अलिबाग ।
लायन्स क्लब आँफ श्रीबाग तर्फे जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने सर यांच्या मार्गदर्शनानूसार जिल्हा रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय, रक्तपेढीविभाग, एनजीओ आदी महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत कार्यरत समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा “कोरोना योध्दा”म्हणून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात लायन्स क्लब श्रीबाग अलिबागच्या सचिव अँड. डॉ.ला.निहा राऊत मँडम,ला.कला पाटील मँडम,ला.तानाजी भोसले जिल्हा रुग्णालय एआरटी विभागाचे डॉ. पी.एस. शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोरोना काळात महाराष्ट्र एड्स नियंत्रण सो.अंतर्गत जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय तसेच एनजीओ कार्यरत कर्मचाऱ्यांनी रुग्णांना आरोग्य सेवा देऊन “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या राज्यव्यापी अभियानांअतर्गत मोलाची कामगिरी केलेली आहे अशा कोरोना योध्दांचा सत्कार लायन्स क्लब श्रीबाग(अलिबाग) संस्थापिका डॉ. अँड. ला.निहा राऊत ( ऊपाध्यक्ष),ला. कला पाटील,ला तानाजी भोसले( डायरेक्टर) डॉ. पी.एस शिंदे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन “कोरोना योध्दा” म्हणून सन्मानित करण्यात आले.
लायन्स क्लब सचिव ला.निहा राऊत या वेळी म्हणाल्या कि,म.रा.ए.नि. कर्मचाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील रुग्णांना जी सेवा दिलेली आहे ती देशाभिमानाची बाब आहे. “सेवा हाच धर्म”हे लायन्स क्लबचे ब्रीद वाक्य आहे आपल्या अतुलनीय सेवाकार्याबद्दल आपणास” कोरोना योध्दा” म्हणून सन्मानित करण्यात येत आहे.
म.रा.ए.नि.कर्मचाऱ्यांतर्फे अमोल नारखेडे(पेण )यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी वर्षभर कोरोना काळात रुग्णसेवा दिलेली आहे तसेच आमचे ही कर्मचारी/अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली होती. पण आमच्या कामाची योग्य दखल घेऊन आमच्या कामाची लायन्स क्लबने एकप्रकारे पोचपावती दिली आहे त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने लायन्स क्लब श्रीबाग, चे आभार मानले.
यावेळी जिल्हा रुग्णालय एड्स नियंत्रण विभाग,आयसीटी, एसटीडी, एआरटी, रक्तपेढीविभाग, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, एनजीओ आदी कर्मचारी बहूसंख्येने उपस्थित होते.80 कर्मचार्या चा सन्मान करण्यात आला.








Be First to Comment