Press "Enter" to skip to content

मोहोपाडा मुख्य बाजारपेठ रस्ता झाला काॅक्रीटीकरण

व्यापारी असोसिएशनच्या वतीने माजी सरपंच संदिप मुंढे आणि सरपंच ताईं पवार यांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

मोहोपाडा ही रसायनी पाताळगंगा परिसराची महत्वाची बाजारपेठ आहे. मोहोपाडा प्रवेशद्वाराहून बाजारपेठेत येत असताना पेव्हर ब्लॉक रस्त्यांच्या बाहेर आल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.हि समस्या अनेकदा नागरिकांनी माजी सरपंच संदिप मुंढे यांना सांगितली होती.

यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे यांनी जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे आणि वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताईं पवार यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा केला.अखेर प्रयत्नांना यश आल्याने मोहोपाडा प्रवेशव्दार ते गुरुकृपा हा तीस फुट रुंद आणि दिडशे मीटर लांब रस्त्याचे काॅक्रीटीकरण करण्यात आले.मोहोपाडा प्रवेशद्वार कमानीपासून मुख्य बाजारपेठेतील रस्ता काॅक्रीटीकरण झाल्याने नागरिकांना बाजारपेठेतील प्रवास सुखकर झाला आहे.यामुले व्यापारी वर्गही समाधानी आहे.

मोहोपाडा बाजारपेठेतील मुख्य रस्ता उत्तम दर्जाचा केल्याने मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्यावतीने माजी सरपंच संदिप मुंढे आणि सरपंच ताईं पवार यांचे आभार मानून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यापारी अससोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपशेठ पाटील,उपाध्यक्ष मनोज सोमाणी,सेक्रेटरी अमित शहा, सहाय्यक सेक्रेटरी सचिन मालकर व कार्यकारिणी सदस्य विलासशेठ ओसवाल,सतीश ओसवाल,सुजित (आप्पा)पाटील,प्रभुराम कुमावत,रनछोड माली,सुरेश माली उपस्थित होते . त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर व व्यापारी विक्रमशेठ ओसवाल उपस्थित होते.

मोहोपाडा बाजारपेठेतील खोलंबलेला रस्ता माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या प्रयत्नाने झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.