Press "Enter" to skip to content

माथेरान पाणी प्रश्न जटिल ! महागड्या अशुध्द पाण्याचा होतोय पुरवठा

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

माथेरानकरांच्या मागील पाण्याचे शुक्लकाष्ठ सुटण्याचे नाव घेत नसून पालिकेकडून वारंवार सूचना देऊन ही माथेरांकरांना रोजचा सुरळीत पाणी पुरवठा होत नसून अनेकवेळा गढूळ पाणी पुरवठा होत आहे त्याविरोधात सोशल मीडिया वर तीव्र प्रतिक्रिया उठताना दिसत आहेत.माथेरान करिता येथील शारलेट लेक व नेरळ येथून उल्हास नदीचे पाणी जलवाहिनी यांद्वारे घेऊन पाणी पुरवठा केला जात आहे येथील शारलेट लेक ची पाणी साठवणी मर्यादित आहे त्यामुळे माथेरान करांना नेरळ येथून होणाऱ्या पाणी पुरावठ्यावरच अवलंबून राहावे लागत आहे येथून खेचले जाणारे पाणी नेरळ माथेरान घाटातील जुमापट्टी, वॉटर पाईप ह्या पंप स्टेशन द्वारे माथेरान मधील जलशुद्धीकरण केंद्रात पोहचविले जाते ,घाटातील दोन पंपिंग स्टेशन ह्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत येथून पाणीपुरावठा सुरळीत झाला तर माथेरानकरांना रोज पाणी मिळते पण येथेच नेहमी काही ना काही गडबड होत असून माथेरानचे पर्यटन लक्षात घेता माथेरानला रोज बारा तासाहून अधिक वेळ पंपिंग झालीच पाहिजे पण प्रत्यक्षात सरासरी सात ते आठ तासच पंपिंग होत असल्याने माथेरान मधील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तर घाटातील पंपिंग बिघडल्यास काही भागांना पाणी पुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत नेरळ मधील पाणी बंद झाल्यास माथेरानमधील शारलेट लेकचे पाणी वापरले जात आहे व वारंवार हे पाणी वापरले गेल्याने लेकच्या पाण्याची पातळी खूपच खाली गेली असून मे महिन्याच्या पर्यटन हंगामामध्ये माथेरान करांना पाणी टंचाईस तर सामोरे जावे लागणार नाही ना अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे माथेरानच्या शारलेट लेक येथील पाणी शहरास वाटप होत असताना त्याचे पुरेसे शुद्धीकरण होत नसल्याचे आढळून येत आहे येथील जलशुद्धीकरण केंद्र हे ब्रिटिश कालीन असून त्याच्या क्षमतेच्या दुप्पट पाणी सध्या माथेरान करांना लागत आहे त्यामुळे पुरेसे शुद्ध पाणी माथेरांकरांना उपलब्द होत नाही तसेच 46 कोटी रुपयांची माथेरानकरिता नवीन पाणी योजना व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वापरण्यात आले पण ह्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून उद्घाटना पूर्वीच येथे बनविण्यात आलेल्या टाक्या लिकेज झाल्यापासून त्याचा उदघाटनास मुहूर्तच सापडलेला नाही कोणीही अधिकारी ह्या इमारत ताब्यात घेऊन हे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही माथेरानमधील स्थानिकांनी अनेकवेळा ह्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी करून ही त्यास अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद लाभलेला नाही. माथेरान पर्यटन नगरीस येथील शार्लोट लेक येथून पाणी पुरवठा होत असतो पण मागील काही वर्षांमध्ये येथे झपाट्याने पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने हे पाणी कमी पडू लागले होते त्याकरिता नेरळ येथील उल्हासनदीचे पाणी पंपांद्वारे माथेरानपर्यंत नेरळहून पाणी टंचाईवर मात करण्यात आली पण हे पाणी नेताना माथेरान येथील शार्लोट लेक येथील पंपिंग स्टेशनकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले पूर्वी येथे विज नसली तरी जनरेटरच्या सहाय्याने पाणी पंपिंग करून सर्वत्र वितरित केले जात होते पण नेरळहून येणारे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येऊ लागल्याने शार्लोट लेक येथील कार्यालय बंद पडू लागले त्याच्यामुळे येथे असलेली यंत्रसामुग्री व जनरेटरच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने येथील एक एक सुविधा हळूहळू बंद होऊ लागल्या ज्याचे विपरीत परिणाम आता माथेरानकरांना भोगावे लागत आहेत नेरळ येथील पाणी पुरवठा खंडित झाल्यास व शार्लोट लेक येथील वीज अनियमित झाल्यास माथेरान करांना पिण्याच्या पाण्यास मुकावे लागते येथील लाखो रुपयांचे जनरेटर वापराविना गंजले आहेत जिल्ह्यात सर्वात जास्त पाणी बिल माथेरानमध्येच आकारले जाते तरीही अनेकवेळा वीज नसली कि येथील पाणी पुरवठा खंडित होत असतो असे वर्षातून दोन तीन वेळा होत असते त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यास जल प्राधिकरण अपयशी ठरले आहे . माथेरानमध्ये व्यावसायिक व घरगुती अशी जवळपास तेराशे नळजोडण्या आहेत त्याचे मासिक उत्पन्न सरासरी वीस लाखाच्या आसपास होते म्हणजे जोडण्याच्या हिशोबाने येथे उत्पन्न जास्त आहे कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन पाच सहा लाख पकडले तरी जलप्राधिकरणाकडे मोठी रक्कम उरत आहे पण नेरळ ते माथेरान ह्या दरम्यान असलेली मोठी पंपिंग स्टेशन व त्याला लागणारी वीज ह्याच्या देयकांची रक्कम बारा लाखाच्या आसपास आहे व ह्यामुळेच हि पाणी योजना माथेरान करांना महाग ठरत आहे जल प्राधिकरण हि विजेची बिले माथेरानकरांकडून जादा भाडे लावून वसूल करीत आहे व ह्याच पंपिंग स्टेशनवरून अनेक पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत त्यांना मात्र त्यात सूट मिळत आहे तसेच शासनाकडून वीज बिल मध्ये सवलत मिळण्यासाठी प्रयत्न न करता माथेरानकरांना वेठीस धरले जात आहे इतके करूनही माथेरानकरांना मात्र दिलासा नाहीच पाणी बिले भरण्यास विलंब झाल्यास पाणी जोडणी कापल्या जातात . माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आपल्या दालनामध्ये जलप्राधिकारणाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून माथेरानला होणारा पाणीपुरवठा अखंडित व्हावा ह्या करिता तंबी देऊन ही मागील काही दिवसांमध्ये माथेरांकरांना दूषित पाणीपुरवठा केला गेला त्यामुळे हे अधिकारी माथेरानच्या पाणीपुरवठ्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचेच दिसून येत आहे.

माथेरान करांना शुध्द व पुरेसा पाणी पुरवठा नियमित व्हावा ह्या करिता माथेरान पालिका जलप्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेऊन असून काही तांत्रिक अडचणी सोडवून समस्त माथेरांकरांना लवकरच सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल तसेच कोरोनाकाळातील वीज बिलांमध्ये सवलत मिळविण्याची बोलणी जलसंपदा मंत्री यांच्या बरोबर अंतिम टप्प्यात असून हा ही प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल.

प्रेरणा सावंत नगराध्यक्षा माथेरान

माथेरान करांना पाणी बिलांमध्ये सवलत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी आम्ही पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केली असून एक वर्षाचा काळ लोटून गेल्यानंतर सुद्धा आमची मागणी अजून पूर्ण झाली नाही.

शिवाजी शिंदे– विरोधी पक्षनेते,नगरसेवक माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.