Press "Enter" to skip to content

चौक महसूल विभागात कोरोना रुग्णांची हजारी : यंत्रणा सज्ज

वासांबे मोहोपाडा शुन्यावर

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

ग्रामीण,शहरी,आदिवाशी,दुर्गम, औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या चौक महसूल विभागात १००० कोरोना रुग्णांचा टप्पा झाला असून महसूल विभाग, ग्रामविकास,आरोग्य यंत्रणा सज्ज व सावधान झाल्या आहेत.

कोरोना या संसर्गजन्य रोगाने जगभरात हाहाकार माजवला आहे,दरम्यान नागरिक,डॉक्टर, पोलिस,महसूल यंत्रणा,आरोग्य विभाग,सफाई कामगार, सामाजिक संस्था,कार्यकर्ते व सर्वच शाशकीय यंत्रणा यांच्यामुळे तो आटोक्यात येत असतानाच पुन्हा तो उसळी घेताना दिसत आहे,त्यामुळे शाशकीय यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांच्यात भीतीदायक चित्र आहे.सर्वसामान्य नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसत आहेत,तर काही अतिउत्साही लोकांमुळे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.याला चौक महसूल विभागही अपवाद नाही.

चौक महसूल विभागात ५० महसूल गावे व ११४ वाडया-वस्त्या आहेत.औद्योगिक क्षेत्र, शहरी विभाग,ग्रामीण विभाग,दुर्गम, अतिदुर्गम विभाग,भौगोलिक स्थिति वेगवेगळी,जगातील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरानच्या पायत्याशी ते टोकापर्यंत वस्ती असणाऱ्या या भागात जवळपास चाळीस किमी.परिघ क्षेत्र असून ७० हजार च्यावर लोकसंख्या असणाऱ्या भागात कोरोनाचा १००० वा रुग्ण आढळल्याने सर्वच शासकीय यंत्रणा सावध व सज्ज झाल्या आहेत.२१ में २०२० रोजी पहिला पुरुष रुग्ण आढळला,तर ३० जून २०२० रोजी पहिला मृत्यु स्रीरूपाने झाला.आजपर्यंत ३८ कोरोनाचे मृत्यु झाले आहेत.तर ९६२ रुग्ण बरे झाले.दरम्यान या कालावधीत जनजागृति, माझे कुटुंब माझी जबाबदारी स्वच्छता, गरजू यांना अन्नधान्य वाटप, रोजच्या जेवनाची सोय, परप्रांतीय कामगार यांना त्यांच्या राज्यात पाठविन्या ची सोय करण्यात आली होती.

तहसीलदार इरेश चप्पलवार,गट विकास अधिकारी संजय भोये, पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगड़े,संजय बांगर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकड़े,डॉ. अनिलकुमार शहा,तर लोहोप अंतर्गत लोहोप,वाशिवली, वासांबे,मोहपाडा,रिस येथे डॉ. किरण पवार,तर चौक,हातनोली, बोरगांव,कलोते येथे डॉ. नूतन, डॉ.प्रतिभा,डॉ.मनीषा तांदले,सर्व परिचारिका,आरोग्य कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेऊन कोरोना नियंत्रणात आणन्याचा प्रयत्न केला.या सर्वच यंत्रणा बरोबर या विभागाचे मंडळ निरीक्षक नितिन परदेशी यांनी सहकार्य करून मोलाची कामगिरी बजावल्याने हा विभाग नियंत्रणात आहे.

या विभागातील वासांबे मोहोपाडा हा याअगोदर कोरोनाचा व्हाट स्पाॅट होता, सध्या नियंत्रणात आहे.यासाठी वासांबे मोहोपाडा सरपंच, स्वच्छता कमिटी, रसायनी पोलिस, तलाठी,ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांनीही कर्तव्य बजावत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.