Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा परिषद शाळांना भरमसाठ विज बिले

आमदार अनिकेत तटकरेंना शिक्षक समितीचे निवेदन

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

कोरोना काळात दहा महिने सर्व स्तरावरील शाळा बंद त्यात रायगड जिल्ह्यात जून महिन्यात भयानक झालेले चक्रीवादळ तब्बल एक महिना विद्युत पुरवठा खंडित तरी देखील बहुसंख्ये प्राथमिक शाळा व खाजगी शाळा याना भरमसाठ वीज आकारणी व वीज बिलं आल्याने शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली असल्याने याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निमंत्रित सदस्य शिक्षण व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद अलिबाग अजय कापसे यांनी कोकण विधान परिषदेचे आ अनिकेत तटकरे यांना निवेदन दिले आहे

विद्युत वितरक कंपनीकडून शाळांना लावले गेलेले विद्युत कर व विद्युत आकारणी ही व्यवसाईकांप्रमाणे लावली असल्याने ही आकारणी घरगुती प्रमाणे आकारण्यात यावी या हेतूने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने राज्यसरकार ला हे निवेदन आ अनिकेत तटकरे यांना देऊन सदरच्या आकारणीत शाळांना या बाबतची सूट मिळावी यासाठी हे निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती अजय अविनाश कापसे निमंत्रित सदस्य शिक्षण व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी दिली आहे.

शिक्षणाचे सार्वत्रिकरण व सर्व शिक्षा अभियान या धोरणाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक शाळांना विद्युत पुरवठा जोडणी केली असल्याने यात अनेक शाळा या बदलत्या काळानुसार नव्या शिक्षण पद्धतीमुळे डिजिटल करण्यात आल्या असून या शाळांममधून ई-लर्निंग साहित्य स्वतंत्र संगणक कक्ष पहावयास मिळत आहेत त्यातून चांगले विद्यार्थी ही घडत आहेत परंतु या साहित्यांकरिता करण्यात येत असलेला वीज पुरवठा व त्याची वीज आकारणी यात भयानक वाढ होत आहे त्यातच शाळांना मिळणारे अनुदान हे तुटपुंजा स्वरूपाचे असल्याने ही वीज बिलं भरण्याची स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे अनेक शाळांची वीज जोडणी प्रसंगी खंडित करण्यात येते परंतु सदरील वीज बिल आकारणी ही घरगुती प्रमाणे केल्यास शाळांना याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे

तरी शाळांना होत असलेले वीज बिल आकारणी ही घरगुती दराने तसेच वीज बिल भरण्याकरिता शाळांना स्वतंत्र अनुदानाची तरतूद शासना कडून हो याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करून शाळांचा विजबिलांचा प्रश्न सोडविण्याकरिता विधान परिषदेचे आ अनिकेत तटकरे यांना निवेदन देण्यात आल्याचे शेवटी सांगितले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.