Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक घेतली कोरोना लस

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात कोविड – १९ अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

देशात ०१ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक कोरोना लसीचा पहिला डोस खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेतला. तसेच हि कोरोना लस सुरक्षित असल्याने घाबरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला हादरून सोडले. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने आपल्या देशातील जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून आधार दिला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कार्य कौतुकास्पद आहे. मी आणि माझ्या पत्नीने आज कोविड लस घेतली आणि हि लस घेत असताना भिती वाटत नाही आणि कोणताही त्रास झाला नाही. त्या अनुषंगाने अशी चांगली व्यवस्था रुग्णालयात करण्यात आली आहे.

प्रत्येकाला शिस्तीने हि लस दिली जाते, लस दिल्यानंतर अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबवले जाते व चहापाणी दिले जाते. कर्तव्याने व आपुलकीने हि लस दिले जाते त्यामुळे आपण रुग्णालयात नाही तर घरीच लस घेत आहोत असे वाटते, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित करत २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे असे आवर्जून नमूद केले. तसेच हि लस दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबरीने लसीकरणासाठी पात्र असलेल्यांनी हि लस घेऊन आपला भारत देश कोरोनामुक्त करण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.