सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेतर्फे घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेत,आवरे गावचे सुपुत्र व रायगड जिल्हा परिषद सारडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक कौशिक मधुकर ठाकूर यांनी सतत दोन वर्षे रायगड जिल्ह्यात सर्वोत्तम पाच मध्ये येण्याचा मान मिळवला आहे.असा मान मिळविणारे कौशिक ठाकूर हे उरण मधीले पहिले शिक्षक ठरले आहेत.


नवोपक्रम स्पर्धा २०१९-२० मध्ये शालेय शैक्षणिक संग्रहालय या नवोपक्रमास तृतीय क्रमांक व नवोपक्रम स्पर्धा २०२०-२१ मध्ये तळ्याच्या फांजीवर या नवोपक्रमास चतुर्थ क्रमांक मिळविल्या बद्दल जिल्ह्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पनवेलच्या प्राचार्या सौ चंद्रकला ठोके मॅडम यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते वाघ सर, तुपे सर, संतोष दौड सर, लोटे सर, सौ पवार मॅडम, सौ राठोड मॅडम यांच्यासहित विषय शिक्षक उपस्थित होते.








Be First to Comment