Press "Enter" to skip to content

पंचायत समिती सेस फंडातुन कैरे येथे पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याचे काम सुरु

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

गाव तेथे चांगला रस्ता हवाय हे समिकरण गेल्या काही वर्षामध्ये बदलले आहे.पहिले गावामध्ये सिमिट चे किंवा मातीचे रस्ते असयाचे मात्र गेल्या काही वर्षात अनेक गावामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्यामुळे रस्त्यावर उत्तम प्रकारे दिसत असल्याचे पहावयास मिळत आहे.त्याच बरोबर रस्ते चांगले असल्यामुळे गावाचे सुद्धा सौंदर्य दिसत असते.गावामध्ये पेव्हर ब्लॉक चे रस्ते असावे या साठी जिल्हा परिषद सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या माध्यमातून
पंचायत समिती सेस फंडातुन पेव्हर ब्लॉक कैरे येथिल रस्त्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आले.

रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावे यासाठी कैरे गावातील ग्रामस्थ वेळोवेळी मागणी करीत होते .अखेर पंचायत समिती सेस फंडातून निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला.यावेळी राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील मा.सरपंच अविनाश पाटील, मा.सदस्य चंद्रकांत जंगम,विद्यमान सदस्या जयश्रीताई पाटील, सदस्य हरेश पाटील, नंदकुमार पाटील, ग्रामस्थ गणेश पाटील,बाळकृष्ण पाटील,हरिश्चंद्र पाटील,संकेत पाटील, निकेतन मोधळे आदी उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.