सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहा तालुक्यातील सानेगाव हायस्कूलची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. सदर सभेत सानेगुरुजी विद्यानिकेतनचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, उपाध्यक्ष जीवन पाटील, खजिनदार मोहन ठाकूर माजी अध्यक्ष हेमंत ठाकूर, संतोष ठाकूर, व स्थानिक सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वानुमते अध्यक्षपदी मोतीराम गिजे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजू मोरे खजिनदारपदी नथुराम मु ठाकूर यांचीही निवड करण्यात आली.
या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, उपाध्यक्ष जीवन पाटील, खजिनदार मोहन ठाकूर,माजी अध्यक्ष हेमंत ठाकूर सचिव मनोहर मोरे सर यांनी केले. नवनिर्वाचित अध्यक्ष मोतीराम गिजे यांनी अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानीत सर्वांच्या सहकार्याने हायस्कूलच्या समस्या व शैक्षणिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले शेवटी संस्थेचे सचिव मनोहर मोरे यांनी आभार मानून सभा संपली असे जाहीर केले.








Be First to Comment