Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेची सभा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । गोवे – कोलाड । विश्वास निकम ।

नाशिक येथील महामेळावा स्थगित करण्यात आल्यावर रायगड जिल्हा उत्तर विभागातील समाज पदाधिका-र्याचा जोश लक्षात घेता पेण येथे श्री माऊलीप्रसाद ह.भ.प.दिगंबर महाराज राऊत साहेब (राऊत माऊली) यांच्या श्री गुरूनिवास (गुरुकुल) येथे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावाचे आयोजन करण्यात आले होते ह्या मेळाव्यास म.प्रां.तै.म.महाराष्ट्र राज्याचे महासचिव गुरूवर्य मा.प्रा.डाॅ.श्री भुषणजी कर्डिले साहेब व कोकण विभागाचे अध्यक्ष मा. डाॅ. श्री.सतिशशेठ वैरागी साहेब यांनी मोबाईल फोन द्वारे बहुमुल्य मार्गदर्शन केले.

ह्या मेळाव्यासाठी कोकण विभागाचे कार्याध्यक्ष श्री गणेश धोत्रे, ऊ.वि.रा.जि.अध्यक्ष मा.श्री.गणेशजी महाडीक, कार्याध्यक्ष मा.श्री.संतोषजी पोटे, सचिव मा.श्री.हेमंतजी नांदे, उपाध्यक्ष मा.श्री.किरणजी काळे, मा.श्री.संतोषशेठ भोज, खजिनदार मा.श्री.केतन राऊत, मा.सौ.संज्योत चाळेकर मॅडम,पेण तालुका अध्यक्ष मा. श्री.जितेंद्रशेठ लोखंडे , अलिबाग मुरुड तालुका अध्यक्ष मा. श्री.महेशजी राणे, रोहा तालुका अध्यक्ष मा. श्री.संतोषशेठ कोते ,सुधागड तालुका अध्यक्ष मा. श्री.हेमंतजी कटके, कर्जत तालुका अध्यक्ष मा. श्री.निवृत्तीजी कर्पे, सल्लागार ह.भ.प.राऊत महाराज यांच्यासह पेण शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाचे नियम पाळून सभा घेण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.