Press "Enter" to skip to content

कराडे खुर्दं ग्रामपंचायतीकडून अपंग लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी भागातील कराडे खुर्दं ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधी अंतर्गत पाच टक्के निधी वाटप करण्यात आले.

यावेळी कराडे खुर्दं ग्रामपंचायत हद्दीतील एकूण २१ लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी (उदा.तिन चाकी सायकल, कुबड्या, कानयंत्र आदी)प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश अपंग लाभार्थ्यांना सरपंच भारती हेमंत चितले, उपसरपंच यशश्री योगेश मूरकुटे,ग्रामसेवक संदिप लक्ष्मण धारणे, ग्रामपंचायत सदस्य मिनल ठोंबरे,प्रमिला पाटील,मुकेश पाटील, नलिनी कारंदे, नितेश कारंदे, संतोष म्हात्रे,रेवती भोईर, माधुरी चितले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.एकविस अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजारांचा धनादेश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.