सिटी बेल लाइव्ह । उरण । मिलिंद खारपाटील ।
कला क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धांचा समावेश असलेला युवा महोत्सव बोकडविरा ता उरण येथील नवी मुंबई सेझ मैदानावर 3 ते 7 मार्च दरम्यान होणार आहे.सदर महोत्सव उद्घाटन साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख सरनौबत पिलाजी गोळे यांचे वंशज दुर्गअभ्यासक मारुती गोळे,नरवीर सूर्याजी मालुसरे यांचे वंशज सुनीलराजे मालुसरे, छत्रपती संभाजी महाराज यांची दूधआई धाराऊ हिचे वंशज अमित गाडे पाटील, चित्रपट अभिनेते योगेश अवसरे, चित्रपट अभिनेते महेश खुटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, तसेच त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स च्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील असे अध्यक्ष महादेव घरत यांनी सांगितले . विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्याना मान्यवरांच्या हस्ते द्रोणागिरी भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे







Be First to Comment