Press "Enter" to skip to content

गोखले महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी यांची कोरोना चाचणी

सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे ।

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाची कोरोना चाचणी (आरटीफिशिएल टेस्ट) घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आणि रायगड जिल्हा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व शाळा महाविद्यालये सुरू करण्यापुर्वी सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांची कोरोना टेस्ट झाल्याशिवाय शिक्षण संस्था सुरू करण्यात येऊ नये या आवाहनाला प्रतिसाद देत येथील गोखले महाविद्यालयाने आपल्या सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्री एस व्ही जोशी व डॉ श्री मधुकर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन येथिल उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाची कोरोना स्वॅब टेस्ट- घेऊन अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.अशी माहिती एन.एस.एस.विभाग प्रमुख प्रा श्री किशोर लहारे यांनी वार्ताहर प्रतीनिधींशी बोलताना दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.