सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे ।
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीवर्धन येथील प्रसिद्ध कवी श्री सुनील चिटणीस उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.प्राचार्य.डॉ.श्री.एस.व्ही. जोशी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या काव्य वाचन व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला विद्यार्थी वर्गाने भरघोस प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला. सर्वप्रथम कवी कुसुमाग्रज व सरस्वती प्रतीमा पुजन मुख्य अतिथी व प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवी सुनील चिटणीस यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले व आपल्या काव्यातून मराठी साहित्य व भाषा यांचा परामर्श घेतला. प्राचार्य , जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी बोलताना मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगितले व आपल्या काही कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ.भुसाने यांनी तर सूत्रसंचालन प्रा.नवज्योत जावळेकर व प्रा.देवरे यांनी केले. या कार्यक्रमाला एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा श्री किशोर लहारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख,प्रा. डॉ. सौ.कल्यानी नाझरे, आणि महीला मंडळ विभाग प्रमुख, प्रा. सौ. दिपाली निमजे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रा नवज्योत जावळेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.








Be First to Comment