Press "Enter" to skip to content

शिक्षण विभाग अंधारात असेल तर विद्यार्थ्यांचे भविष्य कसे उजळणार ?

पाली शिक्षण विभाग अंधारात, थकीत वीज बिल न भरल्याने गट साधन केंद्र पाली कार्यालयाचे वीजवीतरण विभागाने तोडले कनेक्शन  

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।

कोव्हिडं च्या जैविक महामारीचा फटका जनसामान्यांबरोबरच शासकीय, निमशासकीय कार्यालयांना देखील बसला आहे. कोरोना काळात अर्थचक्र कोलमडून पडलेल्या स्थितीत जनतेचे विजवीतरणच्या वाढीव बिलानी अक्षरशः कंबरडे मोडले. अशातच कोरोना काळातील थकीत वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. याचा फटका पंचायत समिती पाली सुधागड अंतर्गत येणाऱ्या गट साधन केंद्र सुधागड पाली यांनाही बसला. सोमवारी दि. (01)रोजी गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय असलेल्या गट साधन केंद्राचे मीटर क्रमांक 034511027162 चे 16 हजार रुपये इतके विद्युत देयक न भरल्याने कनेक्शन कापण्यात आले.   

विजवीतरण विभागाने यापूर्वी सिद्धेश्वर शाळेचे देखील वीज कनेक्शन कापले होते. शैक्षणिक संस्थांचे वीज तोडली जात असल्याने शिक्षण विभागच अंधारात राहिला, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे उजळणार असा सवाल जन माणसातून सवाल उपस्थित होतोय. यासंदर्भात पूर्वसूचना व नोटीस दिली असल्याचे विजवीतरण विभागाचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पाली सुधागड गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांनी महाराष्ट्र्र राज्य विद्युत मंडळ शाखा पाली सुधागडचे उपकार्यकरी अभियंता यांना पत्रव्यवहार केला असून त्याद्वारे सूचित केले आहे की सदरहू मीटर चे बिल भरण्याकरिता रायगड जिल्हा परिषद अलिबाग, शिक्षण विभाग प्राथमिक या कार्यालयाकडे विद्युत बिल भरणे करिता तरतूद मागविण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत या कार्यालयास विद्युत बिल भरण्यासाठी तरतूद प्राप्त झालेली नाही, दि.31 मार्च 2021 अखेरपर्यंत तरतूद प्राप्त होणे अपेक्षित आहे. तरतूद प्राप्त झाल्यानंतर सदर वीज बिल भरण्यात येईल असे श्रीमती दास यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

कोरोना काळातील थकीत बिले लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन वीज वितरण विभागाकडून करण्यात आले होते. अशातच ठरलेल्या मुदतीत वीजबिल न भरणाऱ्या नागरिक, संस्था अथवा कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महाराष्ट्र्र राज्य विद्युत विजवीतरण कंपनी  यांच्यामार्फत पाली विजवीतरण विभागाला आले. त्यानुसार वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांची कनेक्शन तोडले जात आहे. त्यानुसार गट साधन केंद्र सुधागड पाली यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. वीज देयके भरल्यास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

जतीन पाटील, उप कार्यकारी अभियंता विजवीतरण विभाग पाली सुधागड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.