Press "Enter" to skip to content

खालापूर तहसिलदार इरेश चपल्लवार यांची वासांबे मोहोपाड्यात भेट

कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क लावून खबरदारी घेण्याचे केले आवाहन !

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश‌ खराडे ।

कोरोना कहर पुन्हा राज्यात थैमान करत आसल्याचे चित्र महाराष्ट्रात नागरिकांना पाहवयास मिळत आहे.रायगड जिल्ह्यात याचे प्रमाण कमी असून ते वाढू नये याची खबारदारी घ्यावी या दृष्टीने शासन व्यवस्था पुर्णपणे खबरदारी घेत असून खालापूर तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी वासांबे ग्रामपंचायत हद्दितील मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात कोरोना पाश्र्वभूमीवर जनतेसाठी जनजागृती मोहिम आयोजित केली होती.

तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफल वाढवून जनजागृती मोहिमेस प्रारंभ केला.

यावेळी वासांबे ग्रामपंचायतीच्यावतीने तहसिलदार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तदनंतर तहसिदार यांनी उपस्थित जनसामुदयाला कोरोना पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना सांगितले की,राज्यात पुन्हा कोरोना संक्रमीत रुग्णांची वाढ होत आहे. तरी आपण सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.आपल्या अवतीभवती असलेल्या कित्येक चांगल्या व जीवास जीव देणा-या व्यक्तींना ह्या दुष्ट कोरोनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्यातुन हिरावुन नेले आहे.‌ त्यामुळे आपण सर्वांनीच पुर्वीपेक्षा अधिक काळजी घेऊनच सार्वजनिक जीवनात वागले पाहिजे. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.”जान है तो जहान है”. म्हणुन कृपया आपण योग्य ती काळजी घेऊनच आपला सार्वजनिक वावर करावा. घरातुन बाहेर पडताना मास्क लावा, बाहेरुन आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवा. मला काहीच होणार नाही, मी तंदुरुस्त आहे, माझी रोग प्रतिकारशक्ती खुपचं स्ट्राँग आहे वगैरे वगैरे भ्रमात कृपया राहु नका. ,मानव जन्म पुन्हा नाही. स्वतःसाठी नाही निदान आपल्या कुटुंबासाठी, आपल्या चिमण्या पाखरांसाठी तरी आपली काळजी घ्यायची आहे असे तहसिलदार इरेश चप्पलवार म्हणाले.

यावेळी वासांबे मोहोपाडा हा रविवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला असून तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी ‘मास्क वापरा’सांगत मोहोपाडा बाजारपेठेतील नागरिकांना मास्क वाटप केले.यावेली तहसिलदार इरेश चप्पलवार,रसायनी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला, सभापती वृशाली पाटील, सरपंच ताईं पवार ,माजी सरपंच भाग्यश्री पवार, कृष्णा पारंगे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड, ग्रामविकास अधिकारी केंद्रे ,ग्रामपंचायत सदस्य वआदी मान्यवर उपस्थित होते.यावेली मोहोपाडा परीसरातील मास्क न वापरणा-यांना तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी मास्क वाटप केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.