कोरोनामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवपरिवर्तन संस्था व उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करण्यात आले. यावेळी कोरोना बाबत जनजागृती करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना व्हायरसने गेल्या मार्च महिन्यापासून देशात हाहाकार माजवला आहे. परंतु ठप्प असलेले सर्व सुरळीत सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेत तो वाढू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.


उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नवपरिवर्तन संस्था व उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरातील पालवी हॉस्पिटल जवळ कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना मास्कचे वाटप व सूचना पत्रकांचे वाटप करण्यात आले. या जनजागृतीला जनतेकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी आमदार महेश बालदी, डॉ. विकास मोरे, डॉ. संजीव म्हात्रे, डॉ. घन:श्याम पाटील, उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, नवपरिवर्तनचे विरेश मोडखरकर आदींनी कोरोनापासून दूर रहाण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करीत सूचनांचे पालन केले तर नक्कीच आपण कोरोना होणार नसल्याचे सांगितले.


यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासून आजतागायत कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. सुरेश पाटील, डॉ. सत्या ठाकरे, नवपरिवर्तनचे घन:श्याम कडू, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, दिनेश पाटील, विनोद पाटील, शेखर म्हात्रे,कल्पेश पाटील, लक्ष्मण ठाकूर, किशोर पाटील, नितेश पाटील, प्रज्ञेश म्हात्रे, आर्यन मोडखरकर, विहंग कडू व उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन व नवपरिवर्तन संस्थेच्या सदस्य उपस्थित होते. या जनजागृती बद्दल उरणमधील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment