“पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण” हा संदेश देत कर्जत मध्ये जनजागृती
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जत नगरपरिषदेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण हा संदेश देत कर्जत मध्ये जनजागृती करण्यात आली.
नगरपरिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक, शाळा – महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांचा प्रतिसाद आणि सहभागाने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जत नगरपरिषदेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळून सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी नगरसेविका पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, भारती पालकर, ज्योती मेंगाळ, स्वामिनी मांजरे, संचिता पाटील, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, विवेक दांडेकर, संकेत भासे उपस्थित होते.
सायकल रॅलीत 55 सायकल स्वार सहभागी झाले होते, यामध्ये लहान मुले तर 65 वर्षाचे अशोक नगरे ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता, या रॅलीत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक बळवंत घुमरे हे सहभागी झाले होते.
रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळून निघाली ती मुद्रे रस्त्याने नाना मास्तर नगर, ठाकरे चौक, गुरु नगर, दहिवली पेट्रोल पंप, संजय नगर, शिवाजीनगर, मराठी शाळा सोनार आळी, विठ्ठल मंदिर दहिवली, आंबराई, महावीर पेठ, मुख्य बाजारपेठ, कपालेश्वर मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून नगरपरिषद कार्यालयात आली. यावेळी सायकल चालवा आरोग्य मिळवा, पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी नगरपरिषद कार्यालय अधिक्षक अरविंद नातू, सुदाम म्हसे, मनिष गायकवाड, लक्ष्मण माने, रविंद्र लाड,बाळा निकाळजे नगरपरिषद कर्मचारी तर नागरिक धनंजय बेडेकर, पंकज पाटील आदी उपस्थित होते. एक्सप्लोर 13 सायकलचे संतोष दगडे यांनी रॅलीस आयोजनास सहकार्य केले.








Be First to Comment