सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
बिलिवर्सं इस्टर्नं ट्रस्टच्यावतीने होप फाॅर चिल्ड्रन्स या प्रकल्पाद्वारे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.देशातील हजारो विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची आहे.त्यांना शिक्षणात अडथळा येवू नये,यासाठी बिलिवर्सं ट्रस्टने पुढाकार घ्यावा असे डॉ.के.पी. योहनन मेट्रोपॉलिटन बिलीवर्स ईस्टर्न चर्च यांचे स्वप्न होते.हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी असंख्य शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च बिलिवर्सं इस्टर्नं ट्रस्टच्यावतीने करण्यात येत आहे.
बिलिवर्सं संस्था संपूर्ण भारतात 60,000 विद्यार्थ्यांना मदत करते आणि महाराष्ट्रमध्ये 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत करत आहे.होप फाॅर चिल्ड्रन्स प्रकल्पअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षे शिक्षण घेवून पुढे इंजिनिअर,डाॅक्टर,वकीलही झाले असल्याचे फादर बेनी इपेन यांनी बोलताना सांगितले.

कोरोना पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टिंक्शनचे पालन करुन बिलिवर्सं इस्टर्नं ट्रस्टच्यावतीने होप फाॅर चिल्ड्रन्स अंतर्गत १२१ गरजू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेली प्रमुख मान्यवर म्हणून रमेश कोलांबोली (रायगड जिल्हा भाजप सचिव), श्री कुमार नायर (सामाजिक कार्यकर्ते),भारत अजित करिया, मुंबई धर्मं प्रांताचे सेक्रेटरी फादर बेनी इपेन, सेमिनरी प्रिन्सिपॉल फादर डी.वर्मां, रिजनल काॅडिनेटर जयेश परमार, महेश रावत आणि फिलीप मॅथ्यू , वर्गीस मॅथ्यू आदी उपस्थित होते.








Be First to Comment