Press "Enter" to skip to content

कुंडलीका नदि संवर्धन
रोहेकरांना लुटण्यासाठी : दिलीप वडके

सिटी बेल लाइव्ह । याकूब सय्यद । नागोठणे ।

रोह्यातील कुंडलिका नदि संवर्धनाचे लोकार्पण खासदार शरदचंद्रजी पवार यांचे शुभहस्ते करण्यात आले.आणि रोहेकरांना एक खर्चिक गिफ्ट मिळाले. रोहे अष्टमी नगर परिषदेने सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून मंजूर केला तेव्हा या देखभाल कराविषयी शासनाकडून काहिच नोटींग करण्यात आले नव्हते.

मग ही विस रुपयांची लुट आली कुठून.? हा एक प्रश्न समोर आला आहे.

आम्ही रोहेकर वाड वडलोपार्जित जन्मापासून रोहा येथील स्थानिक रहिवासी असून रोहा हा आमचा मुळगाव त्याच गावातील आमची नदी हे कोणाला सांगण्याची गरज नाही मग त्याच नदीला पहायला यापुढे विस रूपये भरावे लागणार आहेत ही एक शोकांतिका आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की कोरोना महामारी संकटात पूर्ण देशातील गोरगरीब हातावर पोट निर्वाह करणारी जनतेची आर्थिक परिस्थिती कमकुवत नाजूक बनली आहे. हे सर्वांच्या ज्ञानात आहे त्या जनतेला नदी संवर्धन लोकार्पण करून वीस रुपये खर्चिक गिफ्ट म्हणजे न परवडणारी आहे महा विकास आघाडी सरकारने शिवभोजन केंद्र महत्वपूर्ण ही योजना गोरगरीब जनतेच्या हितासाठी संपूर्ण राज्यात निर्माण केली आहे जेणेकरून गोरगरीब जनता उपाशी पोटी राहता कामा नये.जेवणाची थाळी सुध्दा पाच दहा रूपयात मिळत आहे. आणि रोहा कुंडलिका नदी संवर्धन करिता विस रूपये फी आकारणी करणे हे योग्य नाही ते गरिबांना परवडणारे नाही.

एखाद्या कुटुंबाला एका वेळी शंभर रूपयांचा खर्च भारीच वाटतो आहे. रोह्यासारख्या ठिकाणी. संवर्धन फी ही दोन रूपये आकारणी करणे योग्य आहे मात्र खर पाहिले तर गुंतवणूक महाराष्ट्र शासनाची जागाही महाराष्ट्र शासन जीवन प्राधिकरणाची आणि कर लावणारे सर्व विसंगत वाटते आहे.माती भरावाला आणि सिंमेंटीकरणाला विरोध कायम ठेऊन प्रवेश नाम मात्र करावा.अशी संबंधितांकडे मागणी स्थानिक कुंडलिका बचाव संघर्ष समिती रोहा तर्फे श्री. दिलीप वडके यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.