सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
संजीवन शेती व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी कोरोना पाश्र्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र समाजकार्य करण्याचे कार्य करणारे कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक चौक वावर्ले येथील दिपकदादा पाटील यांना शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्काराने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा सभापती नरहरी जिरवाल, सत्यजित तांबे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,गौरवचिन्ह,शाल आदी पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरम्यान चौक वावर्ले येथील दिपक पाटील यांना सामाजिक कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.त्यांना शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment