पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कार्यवाही केली पूर्ण
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
खालापूर तालुक्यातील मौजे तांबाटी येथील स.नं.1अ/1अ क्षेत्र 14-38-20 हेक्टर आर. पैकी क्षेत्र 1-40-00 हेक्टर आर. शासकीय जमीन डोलिवली आश्रमशाळेच्या इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध व्हावी याकरिता विनंती करण्यात आली होती.
त्यानुषंगाने या आश्रमशाळेच्या इमारत बांधकामासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम, 1971) मधील तरतुदीनुसार सखोल चौकशी करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह परिपूर्ण अहवाल उपविभागीय अधिकारी, कर्जत यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यास तहसिलदार खालापूर यांना निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार मौजे तांबाटी ता.खालापूर येथील स.नं.1अ/1अ क्षेत्र 14-38-20 हे.आर. पैकी क्षेत्र 1-40-00 हे.आर. गुरचरण जमीन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि.रायगड यांना डोलिवली आश्रमशाळेच्या इमारत बांधकामासाठी महसूल मुक्त व सारामाफीने जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणखी एक उपलब्धी होणार आहे.







Be First to Comment