Press "Enter" to skip to content

पञकाराना कोव्हीड प्रतिबंधक लस द्या : खालापूरात पञकाराची मागणी

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

कोरोनाचा वाढता प्रभावामुळे वृत्त संकलनासाठी जाणा-या पञकाराना देखील कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण करावे अशी मागणी खालापूरातील पञकारानी तहसीलदार इरेश चप्पलवार यांचेकडे केली आहे.

गेल्या वर्षभर धुमाकूळ घालून काहि कालावधी करता शांत झालेला कोरोना विषाणू पुन्हा डोक वर काढत आहे. खालापूरात कोरोना संसर्गाने आतापर्यंत 125बळी घेतले आहेत.सध्या खालापूर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,पोलीस तसेच पंचायत समितीसह सर्व शासकिय कर्मचा-यांना कोव्हीड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.कर्जत उपजिल्हा रूग्णालय येथे लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे.लोकशाहिचा चौथा स्तंभ म्हणून पञकाराना संबोधले जाते.त्यामुळे पञकाराना देखील कोव्हीड लस देण्याची मागणी लेखी निवेदना व्दारे तहसीलदार कार्यालयाकडे करण्यात आली.

यावेळी पञकार मनोज कळमकर,  रविंद्र जाधव,अमित भोपतराव,दिपक जगताप,प्रसाद अटक ,नगरसेवक किशोर पानसरे  उपस्थित होते.निवेदन नायब तहसीलदार कल्याणी मोहिते यानी स्विकारले.

कोरोना संसर्गापासून पञकार देखील सुटले नव्हते.या कठिण काळात पञकारानी वृत्त संकलन जबाबदारीने पार पडले होते.पञकारना मोफत लस देण्याची गरज आहे.

किशोर पानसरे -नगरसेवक खोपोली नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.