सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे लॉकडाऊनची शक्यता वाढली आहे. ती टाळण्यासाठी जनतेने नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने उरणमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी नवपरिवर्तन संस्था व उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे जनतेने नियमांचे पालन केले नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा देत तो लागू नये म्हणून नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
उरण मुंबई व नवी मुबंईच्या जवळ असल्याने व ये-जा जास्त असल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती दूर करण्याच्या हेतूनेच उरणमधील नवपरिवर्तन संस्था व उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनतेत जनजागृती करण्यात येणार आहे.
सदर जनजागृती शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पालवी हॉस्पिटल जवळ करण्यात येणार आहे. यावेळी कोरोना संदर्भात कोणती खबरदारी घ्यावी याबाबतचे घोषवाक्यांच्या साह्याने तसेच पत्रक आणि मास्कचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजतागायत कोणतीही अपेक्षा न ठेवता अविरत सेवा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर जनजागृती ही शासनाच्या नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे. तरी उरणच्या जनतेने या जनजागृतीचा लाभ घेत दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्यासह आपल्या कुटुंबाची व हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक व उरणकरांच्या हितासाठी कोरोनाला दूर ठेवण्याचे आवाहन नवपरिवर्तन संस्था व उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.








Be First to Comment