सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे ।
प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप म्हणून शिक्षकांना आदर्श पुरस्कार श्रीवर्धन प्रदान करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती शिक्षण विभाग श्रीवर्धन येथील गट शिक्षण अधिकारी शीतल तोडणकर यांनी तालुक्यात प्रथमच स्तुत्य असा कार्यक्रम राबविला आहे.यामध्ये तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
शिक्षक दिनी या सर्व शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले होते ,परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. हे पुरस्कार दिनांक २३,फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शिक्षण परिषदेत सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दांडगुरी केंद्रात रा.जि.प शाळा देवखोल येथे कार्यरत असलेल्या उपशिक्षिका श्री.क्रांति लालासाहेब भोसले (माळवदे)यांना आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीवर्धन प्राप्त झाला.माळवदे यांनी रा.जि. प. शाळा दांडगुरी शाळेत तसेच देवखोल शाळेत विद्यार्थी गुणवत्ता वाढविली.शाळेचे विद्यार्थी क्रीडा व सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांमध्ये नेहमीच चर्चेत व अग्रस्थानी राहिलेले आहेत.त्यांच्याकडे शिकलेले अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित आहेत,तसेच काही विद्यार्थी चांगल्या पदावर नोकरी करीत आहेत. लोकसहभागातून देवखोल शाळा डिजिटल शाळा करण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.अशा शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीवर्धन प्रदान करण्यात आला आहे. कार्यक्रमाप्रसंगी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री होळकर , तसेच सभापती .श्री. चोरगे , सदस्य कोमनाक ,शिक्षक प्रतिनिधी, केंद्रप्रमुख, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.








Be First to Comment