सिटी बेल लाइव्ह । पनवेल । समिर बामुगडे ।
इनरव्हील क्लब बॉम्बे एअर पोर्ट, मिडवेस्ट आणि हार्बरसह इतर वेगवेळ्या क्लबच्या वतीने सन १९८९ पासून पनवेल तालुक्यातील कर्नाळा परिसरात असलेल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी युसूफ मेहेरअली सेंटर विनाशुल्क मोफत शिक्षण देत आहे. ह्याच युसुफ मेहेरअली सेंटरच्या भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक विद्यालयाच्या तारा येथील सात वर्ग खोल्यांची दुरुस्ती व सुशोभिकरण इनर्व्हील क्लबच्या विविध क्लबकडून स्वखर्चाने करण्यात आले.
या वर्गखोल्यांचे विध्यार्थी प्रवेश कार्यक्रम क्लबच्या डि. सी. प्रेसिडेंट श्रीमती आमला मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेंटरच्या अध्यक्षा श्रीमती उषा शहा योगिनीबेन प्रवीण शहा, उपाध्यक्ष हरीश शहा, प्रकल्प संचालक सुरेश रासम, सोनल शहा,ऋता श्रीधर यांच्यासह सर्व क्लबच्या मेंबर्स, शालेय शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.











Be First to Comment