सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
प्रथम एज्यूकेशन फाउंडेशन’चिलठण यांच्या माध्यमातून उंबरखिंड विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोगांचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेवून उत्तम असे प्रयोग सादर करण्यात आले.आपल्या घरामधून टाकावू अथवा बाजार पेठेत सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू पासून त्यांचे प्रयोग करुन विद्यार्थ्यांची अनेकांची मने जिंकली.
यावेळी ३० विद्यार्थ्यांनी विविध असे उत्तम प्रयोग सादर करून शिक्षक वर्गांनी या प्रयोगांचे कौतुक केले. प्रयोगाच्या माध्यमातून आपण त्यांचा दैनंदिन जिवनात यांचा उपयोग करुन आपला बहुमूल्य वेळ वाचावू शकतो.या उद्दात विचारांतून विद्यार्थ्यांमध्ये असलेली कला विकसित करावी शिवाय त्यांना विज्ञान विषयी जागृतता निर्माण व्हावी.या प्रयोगाच्या माध्यमातून भविष्यात मोठे वैद्यानिक व्हावे या दृष्टीकोणातून विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी विज्ञान प्रदर्शन शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात असतात.

यावेळी १५ मॉडेल सह ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी १३३ विद्यार्थ्यांनी हे विज्ञान प्रयोगांची माहिती घेवून आत्मसात केले.त्याच बरोबर १५ शिक्षक,उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा उंबरे,जि.प.शाळा.कारगाव,उंबरे कॉलेज,अदि या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच प्रथम एज्यूकेशन फाउंडेशन’चिलठण – रणजीत वाघमारे,पल्लवी वाघमारे- विज्ञान मित्र, मुख्याध्यापक संदेश घरत,केंद्रप्रमुख नागावकर,शिक्षक- गावडे सर, मिना येरम मॅडम, चवरकर मॅडम व इतर शिक्षक,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment