सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगे महाराज यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
नगरपरिषद कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, नगर अभियंता मनिष गायकवाड, नगर सहाय्यक लक्ष्मण माने, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रविंद्र लाड, कल्याणी लोखंडे, सुरेश खैरे, विभावरी म्हामूणकर, बाळा निकाळजे, शेखर लोहकरे, रुपेश पाटील, संभाजी जगताप, सामिया चौगुले आदी उपस्थित होते.








Be First to Comment