सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।
थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मंगळवारी (ता.२३) रायगड जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
यावेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड, सहाय्यक लेखा अधिकारी संजीव मोरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मणीकदास दळवी, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुरेश पुजारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश गीते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन ओव्हाळ, समाजशास्त्रज्ञ रविकिरण गायकवाड, संवादतज्ञ सुरेश पाटील, क्षमता बांधणी तज्ञ आनंद धीवर, देवेंद्र भगत उपस्थित होते.








Be First to Comment