Press "Enter" to skip to content

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठान या गडकिल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या संस्थेतर्फे दि 18 व 19 फेब्रुवारी या दिवशी विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती उरण तालुक्यात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

दि 18 रोजी द्रोणागिरी गडाची साफसफाई, सजावट, संध्याकाळी विमला तलाव येथील महाराजांच्या मूर्तीला अभ्यंगस्नान,रात्री 10 वाजता दीपोत्सव त्यानंतर महाराजांविषयी इतिहास व द्रोणागिरी किल्ल्याची माहिती सांगण्यात आले. दि 19 रोजी सकाळी 7 वाजता महाराजांचा पाळणा हलविणे, 8 वाजता शिवप्रतिमा पुजन, गडावरती सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक, दुर्गपुजन, मान्यवरांचे स्वागत तसेच शिवभोजन, सायंकाळी 5 वाजता निरोप समारंभ आदी विविध उपक्रमांचे आयोजन दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले होते.

या शिवजन्मोत्सवात आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था उरण,सह्याद्री प्रतिष्ठान उरण, शिवभक्त प्रतिष्ठान उरण विभाग, किल्ले मोहीम ग्रुप गोवठणे, 12 th clasmets 2002 पिरकोन उरण,Fitness bunker Gym -Uran, युवा शक्ती मित्र मंडळ डाउरनगर, शिवछत्रपती मित्र मंडळ करंजा, अवनी सामाजिक संस्था उरण आदी विविध संस्था या शिवजयंती मध्ये सहभागी झाल्या होत्या.सर्व शिवप्रेमी,विविध सामाजिक संघटना, विविध मान्यवरांच्या मदतीने, एकमेकांच्या सहकार्याने ही शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली असे दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कावले यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.