सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
शिवजयंतीचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील गव्हाण गावातील नागपाडा कोळीवाडा येथील “शिवबाचे मावळे मित्र मंडळ” तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे दरवर्षी या गावातील बालगोपाळ एकत्र येतात व ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात.
दरवर्षी गव्हाण गावात बालगोपाळ म्हणजेच 20 वयोगटा खालील सर्व मुलांमार्फत सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते.सदर कार्यक्रमाचे उदघाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणचे अध्यक्ष सुदेश पाटील,कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला हारपुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले.


शिवबाचे मावळे ग्रुपचे अध्यक्ष सुमित कोळी हे दरवर्षी शिवजयंतीचे आयोजन करतात.विविध शिवगीते गाऊन शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.सुमित कृष्णा कोळी -तबला वादक, दीप समाधान कोळी -पकवाज वादक, पार्थ सत्यजित कोळी -गिटार वादक, मिताली प्रसन्न कोळी -गायिका, दिया समाधान कोळी -पेटी वादक, भाविक संतोष कोळी -गायक, प्रसिद्ध गायक किशोर गजानन घरत, लेखक अंकेश कोळी यांनी उत्तम व सुंदर शिवगीते गायली.अनंत मधुकर कोळी, चंद्रकांत पदमाकर कोळी, कृष्णा रघुनाथ कोळी, मधुकर रघुनाथ कोळी, राजेश चंदर कोळी, नंदकुमार कोळी, गणेश दामोदर कोळी, रमाकांत नामदेव कोळी, गणेश पदमाकर कोळी आदी कोळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ति, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment