सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोना काळात जणसामान्यांसाठी केलेल्या कामाचा सन्मान म्हणून कामगार महेंद्रशेठ घरत यांना सकाळ सन्मान 2021पुरस्कारने सन्मानित केल्या बद्दल आज खोपटे येथे फ्रेंड्स सर्कल ग्रुप व खोपटे काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते एल. डी. म्हात्रे,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते केशव घरत, महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा इंटक चे अध्यक्ष किरिट पाटील, एनएमजीकेएस संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील,संघटनेचे उपाध्यक्ष मुरलीधर ठाकूर, रायगड जिल्हा इंटकचे सरचिटणीस विवेक म्हात्रे, उरण तालुका युथ इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत, उरण तालुका युथ इंटकचे सरचिटणीस आदित्य घरत, संघटनेचे संघटक योगेश रसाळ, सुजित म्हात्रे, समीर पाटील व मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व फ्रेंड्स सर्कलचे पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment