57 किलो रंग, 405 किलो मीठापासून 35 फुटाची भव्यदिव्य रांगोळी
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता रांगोळीसाठी आखणी व डिझाईन तयार केली होती सायंकाळी 7 च्या सुमारास जोरदार वारा व पाणी पडल्यामुळे 5 तास केलेली मेहनत पाण्यात वाहून गेली परंतु तरुणांनी हिम्मत हारले नाहीत. त्यांनी पुन्हा रात्री 9 वाजता आखणी करायला सुरूवात केली आणि सकाळी 11 वाजता रांगोळी पुर्ण केली. या रांगोळीमध्ये राजमाता राष्ट्रमाता मॅा साहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन करीत आहेत असा देखावा काढण्यात आला आहे. डाव्या बाजूला खाली शेतकरी दाखविला आहे रांगोळीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. उजव्या बाजूला जवानांची बंदूक टोपी दाखवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.








Be First to Comment