Press "Enter" to skip to content

पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल पाणदिवे येथे शिवजयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजही समाजाला प्रेरणादायी : सुदर्शन भोईर

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।

श्री छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील महत्वाच्या राजेंपैकी एक महत्वाचे राजे होते. जगाला आदर्श वाटावे असे एक शिवरायांचे व्यक्तिमत्व होते. लोकप्रिय, न्यायप्रिय असे जाणते राजे होते. समाजाला आदर्श असे शिवरायांचे व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार व कार्य आजही समाजाला, देशाला प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन सुदर्शन भोईर यांनी केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श कल्याणकारी राजा, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली उरण या सामाजिक संस्थेच्या वतीने पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, दत्त मंदिराजवळ, पाणदिवे-तालुका उरण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्यावर आधारित नवघर येथील प्रसिद्ध व्याख्याते शिवभक्त सुदर्शन नरेश भोईर यांचे सकाळी 10 ते 11 दरम्यान 1 तासाचे व्याख्यान तर 11 ते 12 दरम्यान शिवजयंती निमित्त घेतलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेतील विजेते उमेदवारांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी उरण मधील प्रसिद्ध शिव व्याख्याते सुदर्शन भोईर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याची माहिती आपल्या शिव व्याख्यानातून उपस्थितांना दिली.

सर्वांनी शिवरायांच्या विचाराचे, कार्याचे अनुकरण करावे.शिवरायांचे गुण आत्मसात करावे असे मत व्यक्त करत शिव व्याख्याते सुदर्शन भोईर यांनी शिवरायांचा जीवनपट, जीवनचरित्र उलगडून सांगितला.यावेळी अध्यक्षस्थानी स्वप्नील म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक -रवींद्र बुधवंत, उरण पोलीस ठाण्याचे क्लार्क सचिन केकरे, सामाजिक कार्यकर्त्यां-रंजना गायकवाड, आदर्श शिक्षक -सुधीर मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते -महेश पाटील, छावा प्रतिष्ठान चिरनेरचे अध्यक्ष सुभाष कडू, गोल्डन जुबली मित्र मंडळचे माधव म्हात्रे,टायगर ग्रुप उरण तालुकाध्यक्ष -आकाश जोशी,पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन -प्रकाश पाटील, प्राचार्य योगिता गावंड, प्राचार्य -हर्षाली पाटील, शिक्षक -समाधान पाटील,शिक्षक -गोपाळ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित प्रमुख पाहुणे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी उपस्थितांना मार्गर्दशन केले.यात त्यांनी नागरिकांनी सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळा, मास्क सॅनिटायझरचा वापर करा, शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करा असा सल्ला दिला.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी कौतुक केले.

ऑनलाईन मराठी निबंध स्पर्धेतील विजेते पहिला गट(वय वर्षे 6 ते 11)
1) रिंकल देवेंद्र म्हात्रे
2) सारंगी अनिल पाटील
3) स्वराज प्रदीप म्हात्रे,
दुसरा गट(वय वर्षे 11 ते 21)
1) अस्मिता कोळी
2) क्षितिजा प्रदीप म्हात्रे
3) हर्षाली राजेंद्र गावंड तर
खुला गट(वय वर्षे 21 पुढील )
1) हेमाली बगाराम म्हात्रे
2) सौ. रेश्मा सुदेश पाटील
3)सौ. तृप्ती भोईर यांना प्रमाणपत्र, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे यांनी उपस्थित मुलांना मँगो ज्युसचे वाटप केले.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत म्हात्रे यांनी पेन व पेंटिंगचे साहित्य विजयी उमेदवारांना बक्षीस म्हणून दिले.सदर कार्यक्रम शासनाच्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळून, मास्क सॅनिटायझरचा वापर करून आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मंगेश गावंड तर आभार प्रदर्शन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी -कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.