सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । पाणदिवे ।
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण महाराष्ट्र कोप्रोली तर्फे घेण्यात आलेल्या शिव जयंती निमित्ताने आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी नेत्रदीपक कार्याला मानाचा मुजरा करत ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या यात 11 ते 21 या वयोगटातील महिला या गटात रामचंद्र म्हात्रे विद्यलय आवरे ची विद्यार्थिनी कु क्षितिजा प्रदीप म्हात्रे हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे .
यावेळी अध्यक्षस्थानी स्वप्नील म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक -रवींद्र बुधवंत, उरण पोलीस ठाण्याचे क्लार्क सचिन केकरे, सामाजिक कार्यकर्त्यां-रंजना गायकवाड, आदर्श शिक्षक -सुधीर मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते -महेश पाटील, छावा प्रतिष्ठान चिरनेरचे अध्यक्ष सुभाष कडू, गोल्डन जुबली मित्र मंडळचे माधव म्हात्रे,टायगर ग्रुप उरण तालुकाध्यक्ष -आकाश जोशी,पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन -प्रकाश पाटील, प्राचार्य योगिता गावंड, प्राचार्य -हर्षाली पाटील, शिक्षक -समाधान पाटील,शिक्षक -गोपाळ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित प्रमुख पाहुणे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी उपस्थितांना मार्गर्दशन केले.यात त्यांनी नागरिकांनी सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळा, मास्क सॅनिटायझरचा वापर करा, शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करा असा सल्ला दिला.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी कौतुक केले.
ऑनलाईन मराठी निबंध स्पर्धेतील विजेते पहिला गट(वय वर्षे 6 ते 11)
1) रिंकल देवेंद्र म्हात्रे
2) सारंगी अनिल पाटील
3) स्वराज प्रदीप म्हात्रे,
दुसरा गट(वय वर्षे 11 ते 21)
1) अस्मिता कोळी
2) क्षितिजा प्रदीप म्हात्रे
3) हर्षाली राजेंद्र गावंड तर
खुला गट(वय वर्षे 21 पुढील )
1) हेमाली बगाराम म्हात्रे
2) सौ. रेश्मा सुदेश पाटील
3)सौ. तृप्ती भोईर यांना प्रमाणपत्र, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे यांनी उपस्थित मुलांना मँगो ज्युसचे वाटप केले.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत म्हात्रे यांनी पेन व पेंटिंगचे साहित्य विजयी उमेदवारांना बक्षीस म्हणून दिले.सदर कार्यक्रम शासनाच्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळून, मास्क सॅनिटायझरचा वापर करून आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मंगेश गावंड तर आभार प्रदर्शन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी -कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment