Press "Enter" to skip to content

आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते आंबेवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील आंबेवाडी ग्रा.पं.हद्दीतील विविध विकासकामांचे भूमीपूजनाचा कार्यक्रम विधान परिषदचे आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले आहे.

या विकासकामांतंर्गत आंबेवाडी हनुमान मंदिर संरक्षण भिंत,गावाच्या विहिरीचे वाँल कम्पाऊण्ड व सुशोभीकरण, आदिवासी वाडी येथे समाजमंदिर आदी विकासकामांचे भूमीपूजन आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच श्रीकांत चव्हाण, रा.काँ.तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंडे, युवा नेते राकेश शिंदे,संजय सानप,ग्रा.पं.सदस्य प्रितम पाटील, कुमार लोखंडे,महेंद्र वाचकवडे, भावना जवके, संजय राजिवले, संजय मांडलुस्कर,राकेश कांबळे,दिवाण सानप,महेश पवार,महादेव धसाडे, विश्वनाथ धामणसे,जितेश पार्टे,गणपत लोखंडे,शांताराम लोखंडे, संदेश लोखंडे, जनार्दनभाऊ लोखंडे, महेश लोखंडे, संजय महाबळे,राकेश लोखंडे, काशिराम सानप,पांडुरंग परबलकर,अर्जुन लोखंडे, सुमीत लोखंडे, सुशीला काफरे,सुधीर बारस्कर,गणेश वाचकवडे,अविनाश पलंगे,लहू तेलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.अनिकेत तटकरे यांनी आंबेवाडी ग्रा.पंचायतीचे वतीने अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून गावातील विकासकामांना निश्चितच चालना मिळेल. तर कोकणचे भाग्यविधाते खा.सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांनी वेळोवेळी आदिवासी समाज बांधवांच्या हिताच्या प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रधान्य दिले आहे.व भविष्यात देखील आदिवासी समाजबांधवाचे जिव्हाळ्याचे प्रश्न आम्ही निश्चितच प्राधान्याने सोडवू असे सांगतानाच आंबेवाडी ग्रा.पंचयतीमधील विकासकामांसाठी यापुढेही आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसाद साळवी यांनी केले तर युवा कार्यकर्ते राकेश लोखंडे यांनी आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.