सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी शिशु मंदिर शाळेच्या शिक्षिकांनी शिवपाळणा, पोवाडा, गोंधळ सादर करून शिवरायांचा इतिहास जागा केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका प्राची डेरवणकर, संचिता पाटील, मधुरा चंदन, वैशाली मोरे, पुष्पा दगडे, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, भारती पालकर, नगरसेवक राहुल डाळींबकर, नितीन सावंत, विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे नगरपरिषद कर्मचारी अरविंद नातू, सुदाम म्हसे, अशोक भालेराव, कल्याणी लोखंडे, सुनिल लाड, बापू बहिराम आदींसह शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिका रेखा गोरे, चारुशीला डेरवणकर, अरुणा मोरे, सामिया चौगुले, सरस्वती चौधरी, प्रशांत उगले, शुभांगी कडू, नंदा दुसाने उपस्थित होते.

शिशु मंदिर शाळेच्या शिक्षिका स्मिता निमकर यांनी शिवपाळणा सादर केला, सविता पवार यांनी शिवरायांची जयंती गीत सादर केले, त्यांना सायली जोशी, प्रिती पारठे, अनिता जोशी, शिल्पा ओगले आणि ताराराणी ढोले यांनी कोरस दिला, अश्विनी मराडे यांनी पोवाडा सादर केला तर श्वेताबंरी कुळकर्णी यांनी गोंधळ सादर केलात्यांना मानसी कर्वे, मिना पाटील, दीप्ती निबोंळकर, अंजली अळसुंदेकर, अंकिता कदम यांनी कोरस दिला. सूत्रसंचालन रविंद्र लाड यांनी केले.
यानंतर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगरसेविका, नगरसेवक, कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले.








Be First to Comment