Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये मोफत अश्व तपासणी शिबिराचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

माथेरानची शान समजल्या जाणाऱ्या घोड्यांच्या आरोग्य तपासणी साठी येथील माऊंट बंगला परिसरात मोफत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यास अश्वपालकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माथेरान नगरीच्या उत्तम प्रशासक, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अजित रानडे, प्रमुख पशु शल्यचिकित्सक डॉ. जी. एस. खांडेकर यांनी उपस्थिती दर्शवली. जवळपास चाळीस पेक्षाही अधिक घोड्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून अन्य घोड्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. यावेळी घोड्याना संभावणारे आजार याबाबत डॉ. जी. एस. खांडेकर लिखित माहिती पुस्तिकेचे अनावरण नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, मुंबई पोलीस आयुक्त डॉ. भास्कर जाधव, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, अश्व कल्याण समिती अध्यक्ष सचिन पाटील,नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, स्वाभिमान संघटना अध्यक्ष सागर पाटील,तसेच अश्व पालक, मालक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.