Press "Enter" to skip to content

रोह्यात गावोगावी शिवजयंती उत्सवात शिवभक्तांचा उत्साह

रायड़ावरून धाटावमधे आलेल्या शिवज्योतींचे जागोजागी जंगी स्वागत

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।

   महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज  तारखेनुसार साजऱ्या करण्यात शिवभक्तांचा उत्साह आनंद गगनात मावेना असा होता.शिवजयंतीचे औचित्य साधुन किल्ले रायगड़ावरून धाटावमधे आनण्यात आलेल्या शिवज्योतिंचे रोहा तालुक्यात जागोजागी फटाक्यांचा आतिषबाजीत तर काही ठिकाणी औक्षण करून जंगी स्वागत करण्यात येत होते.यामधे महिला विशेषता तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग असल्याचे पहावयास मिळाले.

मिरवणुकीत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय,संभाजी राजे,सईबाई,हिरकणी अशा विविध वेशभूशेचा साज तरुण वर्गाने चढविल्ल्याचे पहावयास मिलाले.तर रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती निमित शाळेय विद्यार्थ्यांना अवचितगड दाखवू श्रमदान मोहीम राबविली.

    आज छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती मोठ्या आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरी करताना शिवभक्तांचा चांगलाच उत्साह पहावयास मिळाला.रोहा तालुक्यात कोलाड,धाटाव,किल्ला,वाशी रोठबुदृक,रोठखुर्द,लांढर,बोरघर, शिवसंग्राम मित्र मंडळ शेनवई आदि ठिकाणी शिवजयंती निमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. घरोघरी पालखीचे स्वागत आणि औक्षण केले जात होते.शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर जयघोष केला जात होता. तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ जय शिवराय,छत्रपति शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी अशा विविध जयघोषाने संबंध परिसर दनानुन गेला होता.धाटाव गावात शिवजयंती पहिल्यांदाच साजरी करीत असल्यामुळे गावात भगव्या पताका तर संबंध रस्त्यावरुन रांगोळ्या काढून परिसर स्वच्छ  केला होता.गावातील सर्वच उत्साही तरुणांनी उत्तम आयोजन केले होते.

      किल्ले रायगडवरुन रोहयाकडे पहाटे प्रस्थान झालेल्या शिवज्योतिंचे कोलाड पासून रोहयातील गावोगावी जात असताना रस्त्यात जागोजागी पुष्पहार व औक्षण करून स्वागत केले जात होते.जागोजागी फटाक्यांचि आतिषबाजी केलि जात होती. रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद पाशीलकर हे सुद्धा शिवज्योत घेऊन धावल्याचे पहावयास मिळाले.याठिकाणी धाटाव मधील आदेश भोकटे,अनिकेत पाशिलकर,मिथुन मालुसरे,अभिजित मोरे,अनंत म्हसकर यासह तरुणांनी याकामी मेहनत घेतली.

   तर रोहा तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी वर्गाने शिवजयंती निमित शाळेय विद्यार्थ्यांना अवचितगडाची भ्रमंती करून श्रमदान मोहीम राबविली.किल्ल्यावर गडपुजन करून साफसफाई केल्यानंतर गडावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे आकलन करून घेतले.याठिकाणी पत्रकार राजेंद्र जाधव,अनंत देशमुख,राकेश मोरे,प्रशांत देशमुख,अमोल देशमुख,सुहास येरूनकर यांसह सर्व समाज बांधवांनी मेहनत घेतली.

      रोह्यात गावोगावी उत्साहात झालेला हा शिवजयंती उत्सव आम्हा सर्वाना प्रेरणा देणारा ठरला असे अनेक शिवभक्तानि सांगितले.ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर बेधुंद होऊन ताल धरीत लहान मुलांनी मनमुराद पणे आनंद घेतल्याचेही पहावयास मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.