सिटी बेल लाइव्ह । रोहा । समीर बामुगडे ।
रोहा तालुक्यातील नैसर्गिक डोंगरावर मागील अनेक दिवसांपासुन डोंगर पोखरुन बेसुमार माती उत्खनन सुरु आहे, मात्र तक्रारी करुनही महसुल विभागाचे याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचा सामाजिक कार्यकर्ते नारायण खुळे यांनी केला आहे. नैसर्गिक डोंगर अनधिकृतपणे पोखरुन माती उत्खनन करण्याची जणु भु माफियांमध्ये स्पर्धा रोहामध्ये सुरु झाली आहे.

रोहा तालुक्यातील किल्ला,नागोठणे , खारी ,वरसे , धाटाव,या ठिकाणी युध्दपातळीवर माती भराव चालु आहेत, माती माफियांनी डोंगर पोखरण्याची मोहिम सुरु केली असुन,यामुळे भविष्यात तालुक्यातील मोठ्या रहिवासी भागाला धोक्यात टाकण्याचे काम सुरुआहे. जेसीबी ,बुलडोझर ,इत्यादी यांञिकी सामुग्री वापरुन रहिवासी भागाला लागुन असलेल्या वराठी डोंगर पोखरण्याची मोहिम जोरदार सुरु आहे. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.तर मालसई विभागात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. याची माहिती महसुल विभागाला असतानाही ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
आगामी काही दिवसांत हे बेकायदेशीर उद्योग बंद झाले नाहीत, तर रोहा महसुल विभागा विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी जनतेत जोर धरत आहे.








Be First to Comment