सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । धनंजय कवठेकर ।
माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत अलिबाग येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबाग, अलिबाग नगर परिषद यांच्या सयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अलिबाग नगर पालिकेचे नगरसेवक प्रदीप नाईक, लायन्स क्लब ऑफ अलिबागचे सचिव महेश चव्हाण, अविनाश राऊळ यांच्यासह संस्थेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या सायल्कोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षा वरील वयोगटातील मुला मुलींना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तीन गटात हि स्पर्धा होणार आहे. ४० किलोमीटर, ३० किलोमीटर आणि २० किलोमीटर अशा तीन गटात ही सायकल स्पर्धा होणार आहे. क्रिडाभुवन अलिबाग येथून स्पर्धेला सुरवात होईल. तर जोगळेकर नाका येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ स्पर्धेचा समारोप होईल.
४० किलो मीटर गटातील स्पर्धेचा मार्ग अलिबाग मांडवा, रेवस हाशिवरे, कार्लेखिंड असा असेल. तर ३० किलोमीटर गटातील स्पर्धेचा मार्ग अलिबाग मांडवा दस्तुरी नाका येथून परत अलिबाग असा असेल, तर २० किलोमीटर स्पर्धेचा गट अलिबाग चोंढी अलिबा असा असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचना आणि वाहतुक नियमांचे पालन करणे आवश्यक असेल असे आवाहन पाटील यांनी केले. नगर परिषदेच्या वतीने प्रदीप नाईक यांनी स्पर्धेच्या तयारीची माहिती यावेळी दिली.







Be First to Comment