रायगड प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी भारत रांजणकर,कार्याध्यक्षपदी मनोज खांबे तर सरचिटणीस पदी शशिकांत मोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
रायगड प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अलिबाग येथील पत्रकार भारत रांजणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सामाजिक प्रश्नांची जाण आणि भान ठेऊन पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांनी या संघटनेचे काम संस्थापक एस. एम. देशमुख यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पुढे नेले. रायगड प्रेस क्लब म्हणजे एक कुटुंब झाले आहे.रांजणकर यांच्या बिनविरोध निवडीमुळे सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेछ्या दिल्या.

रायगड प्रेस क्लबच्या २०२१–२०२२ साठी नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी खोपोली येथे कँपोलियन क्लब रिसॉर्ट मधे सभेचे आयोजन करण्यात आले होते. तळा येथील दिवंगत पत्रकार मेकडे यांना श्रद्धंजली अर्पण करण्यात आल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव तथा रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय मोकल, माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, अभय आपटे विद्यमान अध्यक्ष अनिल भोळे, संतोष पेरणे यांच्यासह अनेक सभासद पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. एकूणच कामकाजाची दिशा आणि सर्वसमावेशकता यावर चर्चा झाली. काही धोरणात्मक बदल आज मान्य करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे जे ठरले ते एकमताने आणि सर्व संमतीने ठरले.

रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणून अलिबाग येथील भारत रांजणकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.तर कार्याध्यक्षपदी महाडचे मनोज खांबे तर सरचिटणीसपदी रोहा येथील शशिकांत मोरे, तर उपाध्यक्षपदी मोहन जाधव आणि प्रशांत गोपाळे, खजिनदारपदी दरवेश पालकर, सहचिटणीस मिलिंद कदम, पद्माकर उभारे, मुख्य संघटक नागेश कदम व मानसी चेऊलकर, संपर्क प्रमुख भारत गोरेगावकर तर सहसंघटक संजय भुवड, सह खजिनदार महेश पवार, प्रसिद्धी प्रमुख कमलेश ठाकूर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून रवी शिंदे, गौतम जाधव, प्रसाद नाझरे, अनिल मोरे, कांता हाबले, दिनेश सुतार आदींची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे सल्लागार म्हणून बी एस कुलकर्णी, श्रीकृष्ण बाळ, भाई ओव्हाळ, मुकुंद बेंबडे काम पहाणार आहेत.
या सभेचे यजमान पद खालापूर प्रेस क्लब कडे असल्याने सर्व पदाधिकारी वर्गाने उत्तम नियोजन केले होते. खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनी वेळात वेळ काढून कार्यकारिणीची सदिच्छा भेट घेतली व शुभेच्छा दिल्या.एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या सभेत खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.








Be First to Comment