सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या सुनिता हसुराम पाटील (सुनिता नंदन घरत) यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंचपदी निवड होताच माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत एकनाथ काशिनाथ घरत (शाखाप्रमुख), किशोर बाळाराम केणी (उपशाखाप्रमुख), सुरज बळीराम घरत(सेक्रेटरी), किशोर गणपत म्हात्रे, विनायक हसुराम पाटील(युवा अधिकारी), ओमकार आत्माराम घरत (उपयुवा अधिकारी), राजेश काशिनाथ घरत, नानादन काशिनाथ घरत उपस्थित होते.








Be First to Comment