खैराची तस्करी करणाऱ्यांना पकडले
सिटी बेल लाइव्ह । रोहा । समिर बामुगडे ।
रोहा वनविभागाच्या फिरत्या पथकाने धडक कारवाई करीत बेकायदेशीर खैराची तस्करी करणाऱ्यांना पकडले.
मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन फिरते पथक रोहा यानी विनापरवाना खैर सोलिव मालाची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH-06-BW-3779मौजे वहुर तालुका महाड, मुंबई गोवा रस्त्यावर पकडून खैर तस्करीचा पर्दाफाश केला आहे.


आरोपी १) संतोष गंगाराम तांबे, रा. किये तालुका.महाड(वाहन चालक मालक) २) सह आरोपी दिलीप रामचंद्र माने उर्फ बाबू माने रा.निगडे महाड सदर वाहनामध्ये खैर सोलीव नग १५३,घमि १.४६६,किंमत.१५,८९२/- रूपये व बोलेरो पीकप वाहन किंमत ८,००,०००/- रुपये असे एकूण एकंदर ८,१५,८९२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भारतीय वन अधिनियन १९२७ चे कलम २६(१) फ,४१(२ब),४२अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा श्री इच्छांत कांबळी, वनपाल फिरते पथक रोहा श्री.आर.जी.पाटील,वनरक्षक फिरते पथक रोहा श्री. अजिंक्य संजय कदम व परिमंडळ स्टाफ दासगाव हे करीत आहेत.








Be First to Comment