सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
हळदी कुंकवाच भाळी लेणं, स्त्रीया मानती ते पवित्र सोन ! या विचारा प्रमाणे मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळ व मुक्ता साळवे महिला समुह या बचत गटाने संयुक्तरित्या रायगड जिल्हा परिषद शाळा नागाव, तालुका उरण येथे प्रतिवर्षा प्रमाणे हळदी-कुंकवाचे यशस्वी आयोजन केले.कार्यक्रमाला दोन्ही गटाच्या महिलांची उपस्थिती होती.
प्रमुख निमंत्रीत पाहुण्याच नव्हे तर हितचिंतक म्हणून रंजना चारूदत पाटील-सरपंच नागाव, सीमा अनंत घरत-शेकाप उरण तालुका अध्यक्ष,निता विजय डाऊर-महिला पोलीस, स्वीटी रामचंद्र टिके-महिला पोलीस, कांचन किल्लेदार-शिक्षीका, डॉ.अपर्णा राहुल साठे, संगिता सचिन ढेरे-समाज सेविका, सुमन जगदिश म्हात्रे,विनया कमलेश अस्वले- सीआरपी आणि इतर 65 महिला उपस्थित होते.दोन्ही महिला बचतगटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतिने उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले गेले.


सभेची प्रस्तावना प्रसिद्ध जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.एस.आर.तोगरे यांनी केले तर मी सरपंच म्हणून नवी असेन पण मर्यादेचे उल्लंघन न करता आपल्या गटांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन देते असे मत रंजना पाटील सरपंच नागाव यांनी व्यक्त केले. सीमा घरत यांनी आजची स्त्री अबला नाही ती सबला आहे. संसार सांभाळून विविध कार्य क्षेत्रात अग्रभागी आहे. तुम्ही अनपढ असाल पण अज्ञानी नाहीत. जर आपला जीवनस्तर बदलायचा तर विविध कला शिका.खरेदीदार नका विक्रेते व्हा.साधन नसतील, मशिनरी नसेल तर शासनाचे उपक्रम राबवा अडचण असेल तर आम्ही दूर करतो पण खचू नका अशी हिम्मत बांधली. संगीता ढेरे यांनी तूमच्या झोपडपट्टीत निरक्षर महिला साठी प्रौढ शिक्षणाची आवश्यकता आहे. तूमची इच्छा कळवा संग्राम तोगरे सर पुढील जबाबदारी सांभाळतील. मात्र घर,परिसर व मुल-बाळाच्या स्वच्छते कडे लक्ष ठेवा. रूचिता मलबारी यांनी महिला अॅटोरिक्शाचे शिक्षण व लायसन्सची व्यवस्था, शिलाई काम, भरत काम तसेच कुटीरोद्योग व्यवस्थे संबंधी समयोचित मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी तिळ-गुळ तसेच वाण वाटप करून सुमनताई तोगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.








Be First to Comment