धोकादायक काम त्वरित थांबवून पर्याय काढावा अन्यथा तीव्र जन आंदोलन केले जाईल
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
शहापूर मुरबाड कशेळे कर्जत हाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 अ याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे, परंतु सध्या या महामार्गाच्या साईड पट्टी (शोल्डर) मधून खोदकाम करून टेलिफोन च्या केबल आणि नव्याने महानगर गॅस पाईपलाईन टाकली जात आहे, हे पुर्णपणे चुकीचे आणि धोकादायक आहे, धोकादायक काम त्वरित थांबवून पर्याय काढावा अन्यथा तीव्र जन आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिल गोगटे यांनी दिला आहे.

खोदकाम करून महानगर गॅस पाईपलाईन टाकली जात आहे, कधी रस्ता दुरुस्ती करताना ही पाईपलाईन फुटली तर स्थानिक नागरिकांचे बळी जातील त्यातून जाणारा गॅस अतिशय ज्वलनशील आहे, काही ठिकाणी ही लाईन मोट्या हॉटेल किंवा बिल्डिंग मटेरियल व्यावसायिकांच्या समोरून जाते त्यावरून मोठी अवजड वाहने, मशिनरी जाते त्यावेळी सुद्धा अपघात घडु शकतो बाकी टेलिफोन केबल बाबत तर कर्जतकर इंटरनेट बंद चा अनुभव महिनो महिने घेतच आहेत त्यामुळे हे धोकादायक काम त्वरित थांबवून पर्याय काढावा अन्यथा तीव्र जन आंदोलन केले जाईल असा इशारा रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला होता, त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी आज महानगर गॅस यांना काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत तसेच चुकीचे झालेले काम पुन्हा करावे तो पर्यंत काम करू नये अश्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.








Be First to Comment