आरोपीस २० फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । विशेष प्रतिनिधी ।
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे चिकणी या गावात मोहन हुंनू राठोड ही व्यक्ती बेकायदेशीरपणे गांजा विक्री करीत असल्याची माहिती अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखे कडील नेमणुकीतील पो.ह. प्रशांत दबडे यांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे व त्याच्या पोलिस पथकाच्या मदतीने केलेल्या कारवाईत चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपीस २० फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार खात्री व कारवाई करिता स्था.गु.शा चे पो. उ.नि. सचिन निकाळजे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन खात्री केली असता पो.उ.नि. सचिन निकाळजे यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी, रोहा यांचे समक्ष प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिंदे यांचे उपस्थितीत आरोपी मोहन हंनू राठोड रा.चिकणी ता.रोहा याच्या भंगाराच्या दुकानावर छापा टाकला त्यावेळी आरोपीच्या ताबेकब्जात एकूण ४ किलो गांजा हा अंमली पदार्थ, तसेच गांजा ओढण्यासाठीच्या २८ चिलीम असा एकूण ४८ हजार, ५६० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपीविरुध्द गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे नागोठणे पोलीस ठाणे गु.र.नं १२/२०२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी मोहन ठाकूर यांस रोहे येथील क-स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरक्षक सचिन निकाळजे हे करीत आहेत.








Be First to Comment