सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
“नवजीवन बालनिकेतन बहुद्देशीय संस्था, मु.उरळी देवाची ता.हवेली, जिल्हा पुणे येथे अनाथ व गरीब मुले आणि मुली यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या काही सदस्यांनी नागोठणे येथे विध्यार्थी उन्नती संघाचे विद्यमान सचिव रोहिदास हातनोलकर यांच्या घरी प्रत्यक्ष येऊन भेट घेतली.
विद्यार्थी उन्नती संघाच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी नियमितपणे साहाय्य करण्याच्या संस्कारामुळे रोहिदास हातनोलकर यांनी त्यांचे स्वागत करून
मोठ्या आपुलकीने त्या सर्व सदस्यांची विचारपूस करून त्यांना चहापाणी देऊन संघाचे विद्यमान अध्यक्ष दीपक वाडेकर यांच्यासोबत भेट घालून दिली आणि मग अध्यक्ष वाडेकर, सचिव हातनोलकर आणि सह सचिव सचिन वास्कर यांनी संघाकडे असलेली शालेय वह्या व इतर आवश्यक सर्व साहित्य सदर संस्थेच्या सदस्यांना संघातर्फे मोफत देण्यात आले.
विद्यार्थी उन्नती संघाने मागील २९ वर्षे सातत्यपूर्वक राबविलेले विविध उपक्रम आणि या प्रेमळ मदतीमुळे नवजीवन बालनिकेतन बहुद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य भारावून गेले आणि त्यांनी संघाच्या या सत्वर मदतीबददल संघाच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले आणि पुणे येथील संस्थेच्या कार्यालयास आवर्जून भेट देण्याचे निमंत्रण दिले.
संघाच्या ह्या योग्य व प्रेमळ मदतीमुळे नागोठणे व परिसरात खूप कौतुक झाले.








Be First to Comment