सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन उरण आयोजित 20 वा युवा महोत्सव 3 मार्च ते 7 मार्च 2021 दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान उरण जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आले आहेत.या असोसिएशन तर्फे द्रोणागिरी भूषण पुरस्कार 2021ची निवड झाली असून त्याची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात
किरण मढवी(उलवे )-सामाजिक क्षेत्र,
विद्याधर पाटील(उरण )-शैक्षणिक क्षेत्र,
सुदेश पाटील (कोप्रोली )सामाजिक क्षेत्र,
गणेश मोकल(जसखार )-शैक्षणिक क्षेत्र,
दिगंबर पाटील(उलवे )शैक्षणिक क्रीडा क्षेत्र,प्रज्ञयेश म्हात्रे (पेण )शास्त्रज्ञ,
तुषार म्हात्रे (पिरकोन )शैक्षणिक,
देवेंद्र पाटील पनवेल-शैक्षणिक,
रुद्राक्षी टेमकर (उरण )-क्रीडा,
संजय होळकर-(मोठी जुई)शैक्षणिक,
सायली कोळी(करंजा )वैमानिक,
संतोष बहिरा (पनवेल )योगा क्षेत्र,
विकास कडू(उरण)-सामाजिक क्षेत्र,
यांना ही पुरस्कार जाहीर झाली आहेत. या पुरस्काराचे वितरण बुधवार दि 3/03/2021 रोजी दुपारी 3 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, उरण शहर येथे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळून हे महोत्वस तसेच पुरस्कार वितरण आयोजित करण्यात येणार आहेत .पुरस्कार प्राप्त सर्व उमेदवारांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







Be First to Comment