सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । मनोज पाटील ।
उरण तालुक्यांतील पागोटे येथील जानता राजा व शिवभक्त मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त प्राथमिक शाळा पागोटे येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी १९८४ च्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या हुतात्मांना श्रध्दांजली वाहून शिवप्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात येणार आहे .यावेळी शिवचरित्र दाखविणारा चित्रप्रदर्शन ,शिवाजी महाराजांच्या जिवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा , प्रश्नमंजूषा ,चित्रकला स्पर्धा ,फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .
संध्याकाळी यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे .त्या नंतर शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेची पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .या सर्व कार्यक्रमासाठी व विविध स्पर्धात सहभागी होण्याचे आवाहन प्रदर्शन प्रमुख विवेक चंद्रकांत पाटील ९७६९४८६८०९/ ९५९४३९४५७९ यांनी केले आहे .








Be First to Comment